Coronavirus : बाधितांची संख्या वाढू लागली

सक्रीय बाधितांची संख्या आता पंधरा हजाराच्या उंबरठ्यावर

पुणे – शहरातील बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनाची पुन्हा चिंता वाढली आहे. बुधवारी सोळाशे, तर गुरुवारी 1 हजार 773 बाधित सापडल्यामुळे संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अत्यवस्थ आणि सक्रीय बाधितांची संख्याही वाढत आहे. दरम्यान, दिवसभरात 1 हजार 680 बाधित करोनामुक्‍त झाले. तर गेल्या 24 तासांत 38 जणांचा मृत्यू झाला.

ऑगस्टच्या सुरुवातीला बाधितांची संख्या उतरणीला लागली होती. त्यामुळे काही दिवसांत करोना आटोक्‍यात येईल, या भाबड्या आशेवर चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारण, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वीसर अनेकांना पडला असून, रस्ते, बाजारपेठा याठिकाणी गर्दी वाढू लागली. त्यामुळे महिन्याच्या अखेरीस प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. आतापर्यंत 1 हजार ते बाराशेच्या आसपास सापडणारी बाधित संख्या गुरुवारी अठराशेपर्यंत पोहोचली.

गुरुवारी (दि. 27) दिवसभरात 6 हजार 92 संशयितांची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 4 लाख 26 हजार 550 जणांच्या तपासणीत 89 हजार 90 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर त्यातील 71 हजार 949 बाधित करोनामुक्‍त झाले.

बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सक्रीय बाधितांची संख्या आता 14 हजार 995 वर पोहोचली आहे. त्यातील 818 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 496 जणांना व्हेंटिलेटर लावले आहे. तर 322 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.