मुंबई – भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनद्वारे धमकी आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नागपूर येथील त्यांच्या कार्यालयात काल दोन वेळा धमकीचे फोन आले होते. हे फोन कॉल कुख्यात गँगस्टर दाऊदचे नाव वापरून केले गेले होते. मात्र आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
नितीन गडकरी यांना आलेले फोन कॉल बेळगावमधून करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे कॉल बेळगाव इथली तुरुंगात कैद असलेल्या सराईत गँगस्टरने केले असल्याचे बोलले जात आहे. तुरुंगात नियमबाह्य पद्धतीने फोन वापरून या कैद्याने हे कॉल केले असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
एका मराठी वृत्त चॅनलने दिलेल्या बातमीनुसार जयेश कांता असं या गॅंगस्टरचे नाव आहे. त्याने तुरुंगात असताना अवैध्य रित्या गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकी दिल्याचे समोर आल्यानंतर नागपूरहून एक पोलीस पथक तातडीने बेळगावला रवाना करण्यात आल्याचे समजते. तुरुंगात असलेल्या या गॅंगस्टरने नेमका गारींनाच का कॉल केला ? धमकी मागचा त्याचा हेतू काय होता ? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित आहेत.
नेमकं काय घडलं
काल नागपुर येथील नितीन गडकरी यांच्या कार्यलायत धमकीचे दोनवेळा फोन आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे नितीन गडकरींना धमकी देण्यात आल्याचे देखील समोर आले होत.तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीने यावेळी खंडणीची देखील मागणी केल्याचे समोर आले होते. थेट केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात असा कॉल गेल्याने एकच खळबळ उडाली होती.