पुणे – जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी येरवडा कारागृहातून पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय पीटर तोपून (मू.झारखंड) असे फरार कैद्याचे नाव आहे
माहितीनुसार, अजय तोपून याने नैसर्गिक विधी करण्यास जात असल्याचे कारण सांगून पळ काढला आहे. ही घटना काल सकाळी अकराच्या सुमारास घडली. पौड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अजय तोपून याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर तो येरवडा जिल्हा खुले कारागृहात शिक्षा भोगत होता