तळेगाव – तळेगाव दाभाडे येथील दहावी परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर शाळेचा 100 टक्के निकाल लागला. निरंजन मंदार थिटे हा विद्यार्थी 98.60 टक्के गुण मिळवून शाळेसह मावळ तालुक्यात अव्वल आला आहे.
भूमी कृष्णा शिंदे 98.60 टक्के आणि स्फूर्ती बबन कडूसकर ही विद्यार्थिनी 97.60 टक्के गुण शाळा, आणि मावळात अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. शाळेत 90 टक्क्यांहून अधिक 24 विद्यार्थ्यांनी गुण मिळविले. संस्कृतमध्ये 8 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण आहेत.
शाळेच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका रेखा परदेशी, सरस्वती संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद देशक, अंमलबजावणी अधिकारी अनंत भोपळे, खजिनदार सुचित्रा चौधरी, शिक्षण समिती अध्यक्ष डॉ. ज्योती चोळकर, सदस्य विश्वास देशपांडे, सुनील आगळे, अनुराधा तापीकर यांनी मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलींची बाजी
वडगाव मावळ – येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर महाविद्यालयाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. शाळेचा निकाल 94.73 टक्के लागला. श्रावणी संजय गोळे 95 टक्के, मुग्धा प्रकाश शिंदे व संज्योत चंद्रकांत खांदवे 94.60 टक्के व रेवती सुरेश आगळमे 93.40 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार रुपलेखा ढोरे, स्कूल कमिटी सदस्य मनोज ढोरे, प्राचार्य उद्धव होळकर, पर्यवेक्षक पोपट कांबळे, उपमुख्याध्यापिका मृणालिनी अनारसे आदींनी केला.