नवी दिल्ली: वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा हा उदयोन्मुख खेळाडू आणि क्रिकेटपटू यांचा आदर्श आहे. त्याचे क्रिकेटमधील योगदान मोठे आहे, अशा शब्दात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी लारावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर असून या मालिकेसाठी लारा एक समालोचक आणि तज्ज्ञ म्हणुन काम करत आहे. त्याची कोवींद यांची भेट घेण्याची इच्छा खुप दिवसांपासून होती, अखेर ती आज पूर्ण झाली याचा आनंद होत आहे, असे त्याने व्यक्त केले. लारा याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंगळवारी राष्ट्रपती भवनात भेट घेतली. लारा याने कोवींद यांना क्रिकेटची बॅट एक आठवण म्हणून भेट दिली.