वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली तालुका हवेली येथे पुणे-अहमदनगर रस्त्याला लागून असणाऱ्या अनेक सोसायटी असून या सोसायटी धारकांना सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते रामभाऊ दाभाडे यांनी पुणे महानगर पालिकेकडे पाठपुरावा करून कावेरी हॉटेलपासून वाघेश्वर मंदिरापर्यंत अनेक गृह प्रकल्पांच्या प्रवेशद्वाराजवळ डांबरीकर करून त्याद्वारे खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा दिला आहे.
याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की पुणे महानगर पालिकेत समावेश झाल्यानंतर वाघोलीतील पुणे नगर रस्त्याला लागून असणाऱ्या अनेक गृह प्रकल्पांच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या कामामुळे व पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते.
याबाबत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार तसेच महानगरपालिकेच्या अधिकारीवर्ग यांच्याकडे पाठपुरावा करून अनेक प्रकल्पांच्या प्रवेशद्वाराजवळ असणारे खड्डे डांबरीकरण करून बुजविण्यात आले आहेत. वाघोलीतील अंतर्गत रस्ते तसेच महा मार्गाला लागून असणारे रस्ते यांच्याबाबत लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा करण्यात येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी रस्त्याची पाहणी सुनील जाधवराव, सुधीर दळवी अतुल चव्हाण, अफाफ पटेल, अभिजित अरोरा,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.