मुंबई – संजय लीला भंसाली हे आपल्या आगामी प्रोजेक्टद्वारे लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. त्याच्या आगामी ‘हिरामंडी’ या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला असून त्यासोबत या सिरींजमधील पात्रे देखील रिव्हील झाली आहेत. नेटफ्लिक्सवर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे.
‘हिरामंडी’ ची कथा जुन्या काळातील वेश्याव्यवसाय आणि त्यातील महिलांसंबंधी भाष्य करणारी आहे. टीझरमध्ये प्रथम मनीषा कोईराला दाखवण्यात आली आहे, जी सोनेरी रंगाचे कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली दिसत आहे. यानंतर आदिती राव हैदरी, संजीदा शेख, रिचा चढ्ढा, शर्मीन सहगल आणि सोनाक्षी सिन्हा यांचा लूक देखील रिव्हील करण्यात आला आह.
याआधी 80 च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री मुमताज आणि शबाना आझमी यांनाही या सीरिजसाठी कास्ट करणार असल्याची चर्चा होती, मात्र टीझरमध्ये या अभिनेत्रींची झलक दिसली नाही.
View this post on Instagram
हिरामंडी हे लाहोर, पाकिस्तानमधील एक ठिकाण आहे. याच ठिकाणी तवायफ राहत असत. ‘हिरामंडी’ ही वेश्यागृहातील प्रेम, राजकारण, विश्वासघात आणि वारसांची कथा सांगणारी एक आगळीवेगळी सिरीज आहे.मोठी स्टार कास्ट असलेली ही सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.