पुणे – कोथरुड परिसरामधील नागरिकांनी सोमवारी रात्री चोर व पोलिसांच्या पाठलागाचा थरार अनुभवला. घरफोडी करणाऱ्या सशस्त्र चोरांना पोलिसांनी जीवाची बाजी लावून पकडले. यातील एका चोरावर 63 तर दुसऱ्यावर 72 गुन्हे दाखल आहेत. उजालासिंग पभूसिंग टाक व बल्लूसिंग प्रभूसिंग टाक ( दोघेही रामटेकडी अंधशाळेच्यामागे, वानवडी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सोमवारी रोजी रात्री 2.30 वा थे सुमारास पंचरत्न सोसायटी येथे काही व्यक्ती चोरी करणेस आल्याची माहीती मिळाली होती. तेथे तातडीने पोलीस उपनिरीक्षक शेळके, बीट मार्शल व इतर रात्रग्रस्तीवरील पोलीस पोहोचले. पोलीस आल्याची चाहूल लागताच सदर ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या व्यक्तींनी बिल्डींगमधून जिन्याने खाली येऊन पोलीस अधिकारी व अमलदार यांचेवर धारदार हत्यारासह हल्ला करून जिये ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी बल्लूसिंग प्रभूसिंग टाक याला झडप टाकून पकडले तर उजालासिंग पभूसिंग टाक याचा एक ते दिड किलोमीटर पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे मोठया प्रमाणावर दरोडा टाकणेसाठी आवश्यक असलेल्या कटावण्या, लहान मोठया वेगवेगळ्या धारदार सुन्या, कटर, एक तवेरा गाडी, तसेच दरोडा टाकून मिळविलेले दागिने व एक घडयाळ असा मुद्देमाल जप्त केला . बल्लूसिंग टाक यांचेविरुध्द 63 गुन्हे तर उजालासिंग टाक याचेविरुद्ध 72 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाणेमध्ये दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाचा प्रयत्न, घरफोडी य वाहन चोरीचे गुन्हे आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, म सह आयुक्त,डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक आयुक्त गजानन टोणपे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे , उपनिरीक्षक शेळके, सहायक फौजदार नंदकिशोर सागुंर्डे, अंमलदार सत्तार चव्हाण, सुरज सपकाळ, मनोहर कुंभार, स्वप्निल गायकवाड, मरगळे, बुरले, गजभारे व चालक होनाजी धादवड यांनी व केली आहे.