नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अहमद पटेल यांचा निधनाने काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण एक चांगला मित्र, सहकारी आणि कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.
Congress President Smt Sonia Gandhi’s condolence message on the demise of Shri Ahmed Patel. pic.twitter.com/JiOwjr3j1n
— Congress (@INCIndia) November 25, 2020
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आजचा दिवस आमच्यासाठी दुखद आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधार स्तंभ होते. त्यांनी पडत्या काळात पक्षासाठी मोलाचे काम केले. त्यांचे पक्षाच्या पायाभरणीत मोठे योगदान होते. त्यांची आठवण कायम राहिल, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
It is a sad day. Shri Ahmed Patel was a pillar of the Congress party. He lived and breathed Congress and stood with the party through its most difficult times. He was a tremendous asset.
We will miss him. My love and condolences to Faisal, Mumtaz & the family. pic.twitter.com/sZaOXOIMEX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 25, 2020
तर प्रियंका गांधी यांनी अहमद पटेल यांच्या मृत्यूमुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याचे म्हंटले आहे.
Ahmed ji was not only a wise and experienced colleague to whom I constantly turned for advice and counsel, he was a friend who stood by us all, steadfast, loyal, and dependable to the end.
His passing away leaves an immense void. May his soul rest in peace.— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 25, 2020