लाहोर : भारताच्या ‘इंडियन प्रिमियर लीग’प्रमाणेच पाकिस्तामध्येही ‘पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) आयोजन दरवर्षी करण्यात येते. देशात या क्रिकेट सामन्यांची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. मात्र या सर्वात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून केलेल्या ट्विट्सची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.
नजम सेठी यांनी आपल्या जवळच्या मित्रांना तसेच उच्चपदस्थ लोकांना पीसएलचे सामने पाहण्यासाठी मोफत तिकीट मागू नये, असे आवाहन करणारे खास ट्विट्स केले आहेत. एका महिन्यानंतर पीसीबीचे सामने सुरू होणार आहेत. असे असताना नजम सेठी यांनी एक खास ट्वीट केले आहे.
“पुढील महिन्यात पीएसएलचे सामने सुरू होत आहेत. त्यामुळे मी माझ्या मित्रांना तसेच उच्चपदस्थांना विनंती करतो की त्यांनी पीएसएलचे सामने पाहण्यासाठी मोफत तिकिटांसाठी विचारणा करून नये. नॅशनल असेंब्लीच्या एका समितीने असे करण्यास मनाई केली आहे,” असे सेठी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
1) I am making a personal request to all friends and high-ups NOT to ask for free tickets/passes to PSL matches starting next month. The Public Accounts Committee of National Assembly that audits PCB has warned us to desist from this practise!
— Najam Sethi (@najamsethi) January 20, 2023
पुढील ट्विटमध्ये नजम सेठी यांनी चक्क नोकरीसाठी कोणीही मला शिफारस करू नये, असेच आवाहन केले आहे. “कोणत्याही खेळाडूची, प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी शिफारीश करू नये. तसेच अपात्र व्यक्तीला नोकरी देण्यासाठी विचारणा करू नये. पीसीबी ही जगातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक आहे,” असेही सेठी म्हणाले आहेत.
1) I am making a personal request to all friends and high-ups NOT to ask for free tickets/passes to PSL matches starting next month. The Public Accounts Committee of National Assembly that audits PCB has warned us to desist from this practise!
— Najam Sethi (@najamsethi) January 20, 2023
दरम्यान, पुढील महिन्यात पीएसएलच्या आठव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना मुलतान सुलतान्स आणि लाहोर कलंदर या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. या हंगामातील सामने पाकिस्तानमधील लाहोर, रावळपिंडी तसेच अन्य शहरांत खेळले जाणार असल्याचे पाकिस्तना क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.