नवी दिल्ली : जगाला हतबल करून सोडणाऱ्या कोरोना लसीची आता सर्वानाच प्रतीक्षा आहे. लस तयार करण्यासाठी सर्व संशोधक दिवस एक करत आहेत. यात आघाडीवर असणाऱ्या ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनच्या अॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेल्या लसीचा तिसरा टप्पा आता सुरू झाला आहे. दरम्यान, आता याच लसीचा देशात दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. याची सुरुवात या आठवड्यापासून भारतात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्यावतीने, भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जे चाचण्या घेतात आणि भारतात लस तयार करतात, अशा स्थळांची ओळख पटली आहे, जिथे चाचण्यांसाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आल्या असल्याचे म्हटले जात आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अधिकाऱ्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, या लसीच्या डोसची तपासणी या आठवड्यात सोमवार किंवा मंगळवार सुरू होऊ शकते. आयसीएमआर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घेण्यात येणारी चाचणी वेगवेगळ्या स्थळांमध्ये एकाचवेळी चाचणी सुरू होऊ शकते. ब्रिटनमधील या लसीच्या मानवी चाचण्यांनी चांगले परिणाम दर्शविले आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत केली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही चाचणी भारतात घेत आहे. देशात कोविशील्ड असे नाव देण्यात येत आहे.
दरम्यान, पुण्यात 4 चाचणी ठिकाणी निवड करण्यात आली आहे. या ठिकाणांमध्ये भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जहांगीर क्लिनिकल डेव्हलपमेंट सेंटर, केईएम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि बीजे मेडिकल कॉलेज आणि सासन जनरल हॉस्पिटलचा समावेश आहे. त्याच वेळी, सीरम संस्थेने रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लसीचे व्यावसायिक उत्पादन चाचणी यशस्वी झाल्यावरच सुरू होईल आणि सर्व नियामक मान्यता प्राप्त झाल्यानंतरच होणार आहेत.