केपटाऊन – दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने तयार केलेल्या मिनी आयपीएल स्पर्धेच्या आराखड्याला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. या लीगमधील सहाही संघांचे मालकी हक्क भारताच्या आयपीएल लीगच्याच मालकांनी विकत घेत आपलाच डंका वाजवला आहे.
पुढील वर्षी होत असलेल्या या मिनी टी-20 लीगच्या सहा संघाची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलाव प्रक्रियेत आयपीएल स्पर्धेतील सहा संघांच्याच मालकांनी आपले वर्चस्व राखले.
सर्व सहा संघांची मालकी आयपीएलमधील संघांनीच विकत घेतली. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे निर्देशक व माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ याने या स्पर्धेचे नियोजन करण्यात मोठा वाटा उचलला आहे.
दक्षिण आफ्रिका लीगमधील संघ व मालक
केपटाऊन – मुंबई इंडियन्स
जोहान्सबर्ग – सीएसके
डर्बन – लखनौ सुपर जायंट
प्रिटोरिया – दिल्ली कॅपिटल्स
पार्ल – राजस्थान रॉयल्स
पोर्ट एलिझाबेथ – सनराईजर्स हैदराबाद