नवी दिल्ली – जगभरात थैमान घातल असलेल्या करोनाची निर्णिती कुठून आणि कशी झाली, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर अनेक मतमतांतरे आले. मात्र करोनाची उगम अद्याप स्पष्ट झालं नाही. करोनाची उत्पत्ती चीनमधील वुहान येथील लॅबमध्ये झाल्याचे अनेक आरोप झालं. मात्र चीनने हे आरोप सतत्याने फेटाळून लावले आहेत. या संदर्भात इंग्रजी दैनिकाने धक्कादायक खुलासा केला आहे.
इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, वुहानमधील संबंधित लॅबने चिनी सैन्याच्या गुप्त योजनांसाठी विषाणूंची निर्मिती केली आहे. या लॅबने चिनी सैन्यांसाठी विविध प्राण्यांचे इतरही धोकादायक व्हायरस तयार केले आहेत, असही या रिपोर्टमध्यं म्हटलं आहे.
मागील नऊ वर्षांपासून वुहानच्या लॅबमधील शास्त्रज्ञ जीवशास्त्रातील ‘डार्क मॅटर’ विषयावर संशोधन करत होते. या कालावधीत त्यांना अनेक नवीन विषाणूंचा शोध लावला असून त्या विषाणूचा प्रसारदेखील केला आहे. विशेष म्हणजे हे विषाणू पसरवण्यात चिनी सैन्यातील काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एका चिनी वैज्ञानिकांनं एक जर्नल प्रकाशित केलं होतं. त्यात त्या वैज्ञानिकाने म्हटलं होतं की, मागील तीन वर्षांत चीनमध्ये 143 नवीन आजार सापडले आहेत.