नगर -जिल्ह्यात आज 923 करोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्याच्या रुग्णसंख्येने 39 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत करोनामुळे 644 रुग्णांनी जीव गमावल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, आज 744 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 34 हजार 125 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.37 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 923 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4 हजार 313 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 170, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 423 आणि अँटिजेन चाचणीत 330 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 72, संगमनेर 4, नगर ग्रामीण 8, श्रीरामपूर 5, नेवासे 1, श्रीगोंदा 8, पारनेर 3, अकोले 14, राहुरी 2, कोपरगाव 8,
जामखेड 10, मिलिटरी हॉस्पिटल 35, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 423 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 149, संगमनेर 35, राहाता 15, पाथर्डी 9, नगर ग्रामीण 36, श्रीरामपूर 29, कॅन्टोन्मेंट 6, नेवासे 26, श्रीगोंदा 4, पारनेर 23, अकोले 10, राहुरी 41, शेवगाव 9, कोपरगाव 7, जामखेड 18 आणि कर्जत 6, अशा रुग्णांचा समावेश आहे.