बॉलीवूडमधील ऍक्शन हिरो अर्थात टायगर श्रॉफ याने आता सिंगिंग डेब्यू केले आहे. त्याच्या आवाजातील पहिले “अनबिलीवेबल’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. टायगर केवळ उत्तम अभिनय, वर्कआउट आणि डान्सरच नव्हे तर तो एक गायकदेखील आहे. याचा पुरावा त्याने या गाण्यातून दिल्याचे दिसत आहे.
या गाण्याचे रसिकांकडून खूप कौतुक होत आहे. पुनीत मल्होत्रा यांनी बिग बॅंग म्युझिकसह बनविलेले त्याचे पहिले गाणे “अनबिलीवेबल’ दिग्दर्शित केले आहे. या गाण्यात टायगर श्रॉफने आपला आवाज नव्हे तर तो स्वत: अभिनय करतानाही दिसला आहे. टायगरचे “अनबिलीवेबल’ हे गाणे रोमॅंटिक आहे, ज्यामध्ये तो जबरदस्त डान्स करतानाही दिसत आहे.
टायगरच्या या गाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वरुण धवन यानेही ट्विट करून हे गाणे शेअर केले आहे. टायगरनेही हे गाणे आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हे गाणे शेअर करत त्याने लिहिले की, “जेव्हा मला वाटायचे की एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीवर उडी मारून जाणे कठीण आहे… तेव्हा माझ्यासाठी हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे आव्हान आणि पूर्णत्वाचा अनुभव आहे. जगभरातील संगीताबद्दल खूप आदर आहे, अजून बरेच काही शिकायचे आहे; परंतु तोपर्यंत मी आपणास गाणे सादर करीत आहे.’