मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा हाहाकार अजूनही सुरु आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यातच आता जगभरात कोरोनाचे 66.98 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये जवळपास एक लाख 29 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर 24 तासात 5499 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 66.98 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 92 हजार वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 32 लाख रुग्ण बरे झाले आहेत. वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सातव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 226,713 रुग्ण आहेत. तर 6,363 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 111,900 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 108,450 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 1,923,887 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 110,173 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 39,904 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 281,661 इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 615,870 कोरोनाबाधित आहेत तर 34,039 लोकांचा मृत्यू झाला. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,133 लोकांचा मृत्यू झालाय. 287,740 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,689 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 234,013हजार इतका आहे.