राज्यात करोनाबाधितांची संख्या ४ हजार ४८३ वर

मुंबई : राज्यात करोनाबाधितांची संख्या ४ हजार ४८३ वर पोहोचली आहे. ही सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली.


४ हजार ४८३  करोनाबाधितांमध्ये भिवंडी १, कल्याण डोंबिवली १६, मीरा भाईंदर ७, बृहन्मुंबई १८७, नागपूर १, नवी मुंबई ९, पनवेल ६, पिंपरी चिंचवड ९, रायगड २, सातारा १, सोलापूर १, ठाणे २१, वसई विरार २२ अशी २८३ नवीन रुग्णांची वाढ झाली असल्याचे राजेश टोपे यांनी नमूद केले.

रविवारी एका दिवसात महाराष्ट्रात करोनाचे नवे ५५२ रुग्ण सापडले होते, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ४ हजार २०० वर पोहोचली होती. तर त्यापैकी ५०७ जणांना उपचारानंतर घरी सोडल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.