सातारा -जिल्ह्यात करोनाचा कहर भीतीदायक होत चालला असून करोनामुळे बळी पडलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर तीन टक्क्यांजवळ पोहचल्याने रोजच चिंतेत भर पडत आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये आणखी 30 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असललेल्या चंदननगर कोडोली येथील 70 वर्षीय महिला, करंजखोप ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, नागठाणे ता. सातारा येथील 72 वर्षीय महिला, थोरवेवाडी ता. खटाव येथील 75 वर्षीय महिला, सेवागिरीनगरी ता. सातारा येथील 46 वर्षीय महिला, तान्हाजीनगर ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, तारगाव सातारा येथील 74 वर्षीय पुरुष,
देऊर ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, पसरणी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये पारगाव ता. खंडाळा येथील 65 वर्षीय महिला, फलटणच्या ब्राम्हण गल्लीतील 54 वर्षीय पुरुष, ताथवडे ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 65 वर्षीय पुरुष, पुळकोटी ता. माण येथील 54 वर्षीय पुरुष, कराडच्या शनिवार पेठेतील 77 वर्षीय पुरुष, गणेशवाडी ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, शापूर ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष,
कराडच्या कोल्हापूर नाका येथील 61 वर्षीय पुरुष, कराडच्या गुरुवार पेठेतील 49 वर्षीय महिला, दौलतनगर सातारा येथील 71 वर्षीय महिला, तांबवे ता. वाळवा जि. सांगली येथील 64 वर्षीय पुरुष, सर्कलवाडी ता. कोरेगाव येथील 73 वर्षीय पुरुष, खोडशी ता. कराड येथील 75 वर्षीय महिला, मुंढे ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, सातारा कूपर कॉलनीतील 73 वर्षीय महिला, आटके ता. कराड येथील 44 वर्षीय महिला,
कराडच्या शुक्रवार पेठेतील 48 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, वाळवा जि. सांगली येथील 63 वर्षीय पुरुष, जुळेवाडी ता. कराड येथील 73 वर्षीय पुरुष अशा एकूण 30 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.