सातारा – जिल्ह्यात विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या एक हजार तीन नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर एकूण 906 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 47, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 12, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 70, कोरेगाव 69, वाई 88, खंडाळा 68, रायगाव 120, पानमळेवाडी 158, मायणी 30, महाबळेश्वर 55, दहिवडी 20, खावली 20, तळमावले 37 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 132, अशा एकूण 906 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.