मुंबई – मुंबईतील धारावी झोपडपट्टीतील करोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसू लागली आहे. आज धारावीमध्ये 6 नवीन रुग्ण आढळल्याने धारावीतील रुग्णांची संख्या 2,830 इतकी झाली आहे, असे बृहन्मुंबई महानगर पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
धारावीतील 2,459 रुग्ण यापूर्वीच करोनामुक्त झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडून देण्यात आले आहे, असेही पालिकेने म्हटले आहे.
सध्या धारावीतील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 101 झाली आहे. जवळपास महिन्याभरानंतर धारावीतील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 100 पेक्षा अधिक झाली आहे.
धारावीच्या 2.5 चौरस किलोमीटरच्या परिसरामध्ये 6.5 लाख नागरिकांची दाटीवाटीची वस्ती आहे.