शिक्रापूर (वार्ताहर) – करोना विषाणूचा संपूर्ण जगाने धसका घेतलेला असताना एक दिवस पाळण्यात आलेल्या कर्फ्यूनंतर दुसऱ्या दिवशीदेखील नेहमी गजबजलेल्या अशा शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावर पूर्णपणे शुकशुकाटदिसत होता.
शिक्रापूर येथे करोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून तीन दिवस बंद पुकारण्यात आलेला होता. दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताला एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याचनंतर सायंकाळच्या सुमारास 31 मार्चपर्यंत संपूर्ण बंदचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आणि कर्फ्यूची वेळ देखील पहाटेपर्यंत वाढवली त्यातच नागरिकांनी घेतलेल्या धसक्याची भर पडली आणि नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे सर्व रस्त्यांवर तसेच सर्व गावांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता.
आणि कलम 144 लागू झाल्यामुळे काही ठिकाणी झालेली गर्दी पोलिसांनी लांबवली तर चालू झालेले काही दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या तसेच अनेक पोलिसांना देखील वाहतूककोंडी सोडविणे मुश्कील होत असलेल्या पुणे-नगर महामार्गावर विना पोलिसांची वाहतूक सुरळीत होती.
बोटावर मोजण्याइतकी वाहने या रस्त्याने ये-जा करत होती त्यामुळे नेहमी गजबजलेल्या पुणे-नगर महामार्गावर आणि शिक्रापूर येथे देखील नागरिकांचा पूर्ण शुकशुकाट दिसून येत होता. यावरून जनतेने आणि नागरिकांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे.