नगर -शाळा चालवितात, म्हणजे पैसा कमवितात, अशीच सर्वसाधारण धारणा शाळेच्या संचालकांविषयी असते. अर्थात ही भावना चुकीची आहे. शाळा आणि विद्यार्थ्यी तसेच त्यांच्या पालकांप्रती आत्मियता जपण्याची गरज आहे. करोनासारख्या संकटकाळात सर्वांनाच मदत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन किड्स स्कुल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले.
परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित व विश्वनिर्माण फाउंडेशन संचालित किड्स सेकेंड होम प्री प्रायमरी स्कुलतर्फे विद्यार्थ्यांना किराणा वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत रोहकले, सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर, संचालक संदीप ठोंबरे, कोषाध्यक्ष संदीप गांगर्डे व मनोज बोज्जा आदी यावेळी उपस्थित होते . संस्थेचे सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेतील विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तके व दप्तर इतर शालेय साहित्य शाळेच्या वतीने दिले जाते.
अशी माहिती त्यांनी दिली. मुख्याध्यापिका दीपाली भोसले, शिक्षिका वर्षा गांगर्डे, मनीषा लोखंडे, पूनम परिहार, रोमा सय्यद, राणी उगले व शिवाजी हजारे आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत रोहकले यांनी आभार मानले.