तळेगाव स्टेशन – तळेगावातील पहील्या कोरोना बाधित महीला परिचारिकेचा फाॅलोअप कोविड-१९ चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.तसेच माळवाडीतील दुस-या कोरोना बाधित परिचारिकेच्या संपर्कातील पती आणि दोन्ही मुलांचे चाचणी अहवालही मंगळवारी (ता.१२) रात्री निगेटीव्ह आल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली. यामुळे माळवाडीसह तळेगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
तळेगावचे वैदयकीय अधिकारी डाॅ प्रवीण कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह असला तरी कुठलीही भौतिक लक्षणे न आढळलेल्या मावळातील पहील्या कोरोना बाधित महीलेला ७ मे रोजी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या परिचारिकेने कुठल्याही विशेष उपचारांशिवाय प्रबळ रोगप्रतिकारक शक्तीने कोरोनावर मात केली आहे. तिचा फाॅलोअप रिपोर्ट मंगळवारी (ता.१२) रात्री निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे सध्या तरी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत एकही कोरोना बाधित रुग्ण नाही.
मंगळवारी (ता.१२) रात्री उशीरा आलेल्या या अहवालांमुळे तळेगावसह माळवाडीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी तळेगावातील नागरिकांसह प्रशासनाकडून पुरेसी खबरदारी घेतली जात असली तरी, चोरीछुपे बाहेरील प्रतिबंधीत क्षेत्रातून तळेगावात ये जा करणा-यांमुळे संसर्गाच्या धोक्याची टांगती तलवार कायम आहे
तळेगावातील पहील्या कोरोना बाधित महीला परिचारिकेचा फाॅलोअप कोविड-१९ चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.तसेच माळवाडीतील दुस-या कोरोना बाधित परिचारिकेच्या संपर्कातील पती आणि दोन्ही मुलांचे चाचणी अहवालही मंगळवारी (ता.१२) रात्री निगेटीव्ह आल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली. यामुळे माळवाडीसह तळेगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.