पुणे – पुणे विभागात करोनाबाधित रुग्णांची संख्या, परराज्यात होणारे मजूर स्थलांतर, मजूर तसेच प्रवासी संख्या विचारात घेता रेल्वेगाडीचे नियोजन, राज्यांतर्गत प्रवाशांचे नियोजन, प्रतिबंधीत क्षेत्र, रेड, ग्रीन व ऑरेंज झोनमधील सद्य:स्थिती, ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी चाचणी, रुग्णसंख्या लक्षात घेता बेड क्षमतेत वाढ, केशरी व अंत्योदय योजनेतील धान्य वाटप तसेच सातारा व सोलापूर जिल्हा पाहणी करून प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.
मुख्यमंत्री व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील उपाययोजनांचा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील उपाययोजनाबाबत माहिती दिली.