भारताने जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारलेला 83 सिनेमा कालच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. मात्र त्यानंतर काही तासांतच 83च्या निर्मात्यांना एक जोरदार धक्का बसला
आहे. कारण थिएटरमध्ये रिलीज झालेला 83 ऑनलाईन लीक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 83फचा रिलीज बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत होता.
थिएटर रिलीज झाल्यापासून निर्माते, कलाकार आणि प्रेक्षकदेखील खूप खूष होते. मात्र हा संपूर्ण सिनेमा फिल्मी वॅप, ऑनलाईन मुव्ही वॉच, 123 मुव्हीज, 123 मुव्हीरुल्स यासारख्या फिल्मी आणि पायरेटेड साईटसवर उपलब्ध झाला आहे. एवढेच नाही तर टेलिग्रामवर देखील 83फ उपलब्ध झाला आहे.
ऑनलाईन सिनेमा लीक होण्याने सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सध्या ओमायक्रॉनची साथ पसरण्याचा धोका वाढायला लागल्यामुळे प्रेक्षक पुन्हा
थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याऐवजी मोबाईलवरच 83 चा आनंद घेण्याची शक्यता आहे. रणवीर सिंहने कपिल देव यांची केलेली भूमिका ही या सिमेमाची सर्वात जमेची बाजू आहे.