नगर -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या 40 ते 70 अशी आढळून येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आता शासकीय कार्यालये व दुकानामध्ये जाण्यासाठी कोविड डोस प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. नो व्हॉक्सिन नो एंट्री असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.
सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क सॅनिटाझर अनिवार्य केले आहे. सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना-कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह, लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी कोविड डोसच्या प्रमाणपत्राशिवाय आता प्रवेश मिळणार नाही.
प्रत्येकांची किमान प्रतिबंधात्मक लसीकरणाचा एक डोस घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहणार आहे. निमयांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.