मुंबई – “बाहुबली’ला मिळालेल्या अफाट यशानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित “आरआरआर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरणसह आलिया भट्ट आणि अजय देवगण झळकणार आहेत.
हा चित्रपट सर्वप्रथम जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु त्याची रिलीज डेट पोस्टपॉन करण्यात आली होती. यानंतर “आरआरआर’ 13 ऑक्टोबरला रिलीज होणार होता. पण पुन्हा एकदा त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता परत एकदा या चित्रपटाची प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
आता “आरआरआर’ हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदिर्शत करण्यात येणार आहे. हा चित्रपट एकाच वेळी अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. यासंदर्भात आलिया
भट्टने सोशल मीडियावर एक पोस्टरदेखील शेअर केले आहे. यासोबतच पोस्ट लिहिली की, 7 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहात भेटू या! भारतातील सर्वात भव्यदिव्य असा ऍक्शन ड्रामा पाहण्यासाठी सज्ज रहा.
दरम्यान, “आरआरआर’मध्ये अनेक इंडस्ट्रीमधील कलाकारांची तुकडी एकत्रित पाहावयास मिळणार आहे. यात ज्यूनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट स्टार कलाकार असणार आहेत.