संगमनेर, पारनेर, श्रीगोंद्यातील मोठ्या गावांचा समावेश, जीवनाश्यक सेवा वगळता इतर बंद
नगर – दहा पेक्षा जास्त सक्रिय करोनाबाधित रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावे आता लॉकडाऊन करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी रविवारी हा आदेश काढला आहे. 4 ते 13 ऑक्टोबर रात्री बारापर्यंत ही गावे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आला आहे. त्यात संगमनेरमधील तब्बल 24 गावांचा समावेश आहे. संगमनेर, पारनेर, श्रीगोंद्या या तालुक्यांतील अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यामध्ये दैनंदिनरित्या 500 ते 800 दरम्यान करोनाबाधित रुग्णसंख्या आढळून येत आहेत. तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 5 टक्कांपेक्षा जास्त आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 20 पेक्षा जास्त सक्रीय करोनाबाधित रुग्णसंख्या असलेल्या गावांमध्ये कॅटेन्मेंट झोन जाहीर करणे, बॅरेकेडिंग करणे, पोलिस बंदोबस्त देणे, जनता कर्फ्युच्या माध्यमांतून गावबंदी करणे अशा प्रभावीपणे अंमलबजाणी करणे, ऍग्रीसीव्ह टेस्टिंग करणे, गावांतील नागरिकांचे प्राधान्याने 100 टक्के लसीकरण करण्याबाबतची तपासणी करण्याबाबत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या सूचनानेनुसार दहा पेक्षा जास्त सक्रीय करोनाबाधित रुग्णसंख्या असणाऱ्या गावांच्या ठिकाणी कॅटेन्मेंट झोन घोषित करून करोनाबाधित प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करायची होती. परंतु दहा पेक्षा जास्त सक्रीय करोनाबाधित रुग्णसंख्या असणाऱ्यांना गावांमध्ये कॅटेन्मेंट झोन घोषित करून करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजाणी होत नसल्याची बाब निदर्शनात आलेले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील दहा पेक्षा जास्त सक्रीय करोनाबाधित रुग्णसंख्या असणाऱ्या गावांची यादी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
या गावांमध्ये करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गावातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद करणे, क्षेत्र प्रतिबंधित करणे, क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधित करण्यात येणार आहे.
या गावांमध्ये दवाखाने, मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहे. कृषीमाल व आवश्यक वस्तू वाहतूक वगळता इतर वाहनांना प्रतिबंधित करण्यात येत आहे.
* हे गावे बंद
संगमनेर ः गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, पारेगाव बुद्रुक, पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगाव पान, सायखिंडी. श्रीगोंदा ः लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, आष्टी. राहाता ः भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, कोऱ्हाळे, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार बुद्रुक. पारनेर ः वडनेर बुद्रुक, कान्हूरपठार, गोरेगाव, दैठणे गुंजाळ, जामगाव, भाळवणी. अकोले ः लिंगदेव, विरगाव, परखतपूर, कर्जत ः खांडवी, बाभूळगाव दुमाला. कोपरगाव ः गोधेगाव. नेवासा ः कुकाणा. पाथर्डी ः तिसगाव. शेवगाव ः भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाणे बुद्रुक. श्रीरामपूर ः बेलापूर खुर्द, उक्कलगाव, कारेगाव