2024 SPORTS : २०२३ हे वर्ष क्रीडा जगतात संमिश्र ठरले. एकीकडे भारताला क्रिकेटमध्ये निराशेचा सामना करावा लागला, तर दुसरीकडे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिलांनी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. हे वर्ष स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नावावर होते. दोहा डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक पटकावले.
क्रिकेटमध्ये, भारत प्रथम जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हरला, त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक फायनल जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले, परंतु वर्षभरातील अनेक स्पर्धा भारतासाठी नवीन आशा घेऊन येतील. 2024 हे वर्ष भारतीय खेळाडूंसाठी खास असणार आहे. जाणून घेऊयात येत्या नवं वर्षांमध्ये नेमक्या कोणत्या स्पर्धा आहेत महत्वाच्या.
T20 विश्वचषक
येत्या वर्षात वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या यजमानपदावर टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. गेल्या टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. 2024 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक भारत जिंकेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर महिला टी-२० विश्वचषकही बांगलादेशमध्ये आयोजित केला जाणार आहे.
पॅरिस ऑलिंपिक
2024 हे वर्ष भारतीय खेळाडूंसाठी खूप खास असणार आहे. पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली होती आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. याशिवाय इतर खेळातील खेळाडूंनाही पॅरिस ऑलिम्पिकची तिकिटे मिळाली आहेत.
UEFA Euro 2024
2024 मध्ये, उत्तराखंड 38 व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करेल. ३७ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पुढील राष्ट्रीय खेळांमध्येही खेळाडूंकडून त्या पेक्षा भन्नाट आणि दर्जेदार कामगिरीची अपेक्षा असेल.
या व्यतिरिक्त, दुसरी सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा UEFA युरो 2024 14 जून ते 14 जुलै 2024 या कालावधीत आयोजित केली जाईल. येथे भारतीय फुटबॉल संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. त्याच वेळी, ICC U19 विश्वचषक 2024 दक्षिण आफ्रिकेत होणार आहे.