नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने आपल्या नवी राष्ट्रीय कार्यकारिणीमधून अनेक दिग्गजांची सुट्टी केली आहे. वरुण गांधी आणि मेनका गांधी नंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनाही राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही.
भाजपने केलेल्या या कारवाई नंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांनी आपल्या ट्विटरच्या ‘बायो’ मध्ये बदल करुन नाराजी व्यक्त केली आहे.
सुब्रमण्यम स्वामींनी त्यांच्या ट्विटरच्या बायोमध्ये राज्यसभा खासदार, माजी कॅबिनेट मंत्री, हार्वर्डमधून अर्थशास्त्रात पीएचडी, प्राध्यापक असे वर्णन केले आहे. मात्र यामध्ये त्यांनी कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी बायोमध्ये लिहिले आहे की मी तुम्हाला तेच दिले आहे, जसे मला मिळाले, त्याचे हे संकेत थेट भाजपने केलेल्या कारवाईवर असल्याचे मानले जात आहे. सुब्रमण्यम स्वामींना राष्ट्रीय कार्यकारणीमधून बाहेर काढल्यानंतर ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.