नवी दिल्ली – सोशल मीडियावर एक अजब व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान मुलगी टीव्ही पाहत असून तिच्यासोबत 12 फूट लांबीचा अजगर होता. हा व्हिडिओ LADbible ने पोस्ट केला आहे, जे आतापर्यंत जवळपास 5 दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, ही लहान मुलगी मोठ्या मजेने टेलिव्हिजनवर काहीतरी पाहत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही सोफ्यावर पिवळा ड्रॅगन फिरतानाही पाहू शकता. ती चिमुरडी अजगराच्या भोवती अगदी आरामात बसलेली आहे आणि ती घाबरलेलीही नाही.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही चिमुरडी पूर्णपणे सुरक्षित आहे.’
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर युर्जसद्वारे लाखोंच्या घरात कमेंट्स केल्या जात आहे. काही लोकांना मुलीच्या सुरक्षेची चिंता होती. त्याचवेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतरही काही लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.