आंब्रग येथे शेतात सापडले अजगर

पाटण  – मोरणा विभागातील आंब्रग, ता पाटण येथे भाताच्या शेतात साडे सात फुटांचे भले मोठे अजगर दिसल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली. मात्र वनविभागाच्या सहकार्याने या अजगराला घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोरणा विभागातील आंब्रग या गावात कवळणी नावाच्या शिवारात असलेल्या शेतात महादेव मुळीक हे शेतकरी भाताची कापणी करत असताना त्यांना अचानक शेतात भले मोठे अजगर असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या लोकांना याची कल्पना दिली. लोकांनी अजगराला हटविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र अजगराने काही तरी भक्ष गिळले असल्यामुळे ते जागचे हलता हलत नव्हते. यामुळे उपस्थितांची भीती जास्तच वाढल्याने सरपंच संतोष गुरव यांनी तात्काळ पाटण येथील वनविभागाशी संपर्क साधून अजगराची माहिती दिली.

पाटण वनविभागाचे वनपाल ए. पी. जाधव, सुरेश पवार, सकटे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थ व उपस्थित युवकांच्या मदतीने भल्या मोठ्या अजगराला पकडण्यात यश मिळवले. त्यानंतर अजगराला प्लॅस्टिकच्या पिंपात घालून जेरबंद करुन वनविभागाने त्याला घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)