मुंबई – ‘वीरप्पन’ हे नाव जुन्या पिढीसह नव्या पिढीला देखील माहिती आहे. चंदनचोर असलेल्या वीरप्पनवर आधारित डॉक्युमेंट्री फिल्म लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये वीरप्पनचा सुरुवातीपासून ते शेवट्पर्यंतचा प्रवास उलगडला जाणार आहे. ‘द हंट फॉर वीरप्पन’ असं या माहितीपटाचे नाव आहे.
वीरप्पनची क्रूरता तसेच त्याची दहशत नेमकी कशी होती याबाबतची सर्व माहिती या माहितीपटातून उलगडून सांगितली जाणार आहे. यासोबतच वीरप्पनच्या पैशाचे स्रोत आणि त्याने केलेली चुकीचे कामे यावर देखील या माहितीपटून प्रकाश टाकला जाणार आहे.
जवळपास 30 वर्षे वीरप्पनची भीती कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कायम होती. जिथे तो जंगलात राहत होता आणि त्याचा मुख्य व्यवसाय चंदनाची तस्करी हा होता. यानंतर त्याने हत्तीच्या दातांची तस्करीही सुरू केली. 70 ते 90 च्या दशकापर्यंत वीरप्पन दहशतवादी होता आणि 2004 मध्ये त्याला स्पेशल ऑपरेशन करून मारण्यात आले. या सर्व बाबी या माहितीपटातून उलगडणार आहेत.
‘द हंट फॉर वीरप्पन’ या माहितीपटाच्या टीजरला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. टीजरवरून तर या माहितीपटाच्या उत्कंठा आणखी वाढली होती. येत्या ४ ऑगस्टपासून ही माहितीपटांची मालिका नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.