Allu Arjun: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील त्याच्या गाण्यांनी आणि डायलॉगने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. या चित्रपटाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर ता ‘पुष्पा 2: द रुल या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. सध्या या चित्रपटाबाबत विविध अपडेट समोर येत आहेत. यातच आता ‘पुष्पा 2: द रुल’ साठी अल्लू अर्जुन या चित्रपटासाठी मानधन घेणार म्हंटले जात आहे.
या चित्रपटासाठी सध्या तो मोफत काम करणार असून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो कोट्यावधीची कमाई करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2: द रुल’साठी कोणतेही मानधन घेण्यास नकार दिला असला तरी तो चित्रपटाने केलेल्या एकूण कमाईतून 33 टक्के हिस्सा घेणार आहे. उदाहरणार्थ जर चित्रपटाने 1000 कोटींचा गल्ला जमवला तर त्यामधील ३३ टक्के हिस्सा अल्लू अर्जुनला दिला जाणार आहे.
याशिवाय या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स अॅमेझॉन प्राइमने 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आता अल्लू अर्जुनच्या या बहुचर्चित चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्सने देखील खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. अॅमेझॉन प्राइमने दिलेल्या रक्कमेपेक्षा तीन पट रक्कम नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंग राइट्ससाठी दिली आहे.
दरम्यान, पुष्पा 2 द रुलचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. यात अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पराजच्या भूमिकेत दिसणार आहे. सुकुमार दिग्दर्शित, यात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सने केली असून पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.