Animal : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आणि त्यामुळेच ॲनिमल 2023 या वर्षातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा ओपनिंग चित्रपट बनला आहे. या चित्रपटाची क्रेझ बॉक्स ऑफिसच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये देखील दिसली होती. ‘ॲनिमल’ 1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झाला असून, सिनेरसिकांची मोठी पसंती चित्रपटाला मिळाली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता लोकांना या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचे वेध लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजशी निगडीत काही माहिती समोर आली आहे. रणबीर कपूरच्या या ‘अॅनिमल’चे स्ट्रीमिंगचे हक्क किंवा डिजिटल हक्क हे ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे असल्याने हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. उद्या 26 जानेवारीला नेटफ्लिक्सवर ‘अॅनिमल’ रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. ‘अॅनिमल’मध्ये रणबीरसह रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डीमरी हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.