सर्वात मोठ्या कॅनव्हास पेंटिंगची साडेचारशे कोटी रुपयांना विक्री

लंडन – जगातील सर्वात मोठ्या कॅनवास पेंटिंगची तब्बल साडेचारशे कोटी रुपयांना विक्री करण्यात आली आहे. जर्नी ऑफ ह्यूमॅनिटी नावाच्या या कॅनवास पेंटिंगचा समावेश नुकताच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे.

ब्रिटनमधील  प्रख्यात चित्रकार साच्या जाफरी यांनी हे चित्र तयार केले असून हे चित्र फ्रान्समधील प्रमुख उद्योगपती आंद्रे अडोन यांनी खरेदी केले आहे. या पेंटिंगच्या लिलावातून मिळालेले सर्व पैसे लहान मुलांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येणार आहेत.

हे पेंटिंग एकूण 17 हजार 176 चौरस मीटर या क्षेत्रात तयार केले असून, हे क्षेत्रफळ  जवळजवळ सहा टेनिस कोर्टच्या आकाराएवढे  मानले जाते 70 फ्रेमचा  वापर करून हे भव्य पेंटिंग  तयार करण्यात आले. त्यासाठी तब्बल एक  हजार पासष्ट ब्रशचा वापर करण्यात आला हे चित्र तयार करण्यासाठी 6300 लिटर रंगही वापरण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.