सोमवारी कमलनाथ सरकारची अग्नी परीक्षा

भोपाळ : मध्यप्रदेशात कमलनाथ सरकारला  सोमवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे रविवारी भोपाळ जिल्हा प्रशासनाने शहरात कलम 144 लागू केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार भोपाळच्या काही भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना  एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

16 मार्च ते 13 एप्रिल पर्यंत हे निर्बंध लागू असतील. या अगोदर शुक्रवारी भोपाळ विमानतळाजवळ कलम 144 लागू करण्यात आली होती.

त्याचबरोबर जयपूरला गेलेले कॉंग्रेसचे आमदार आज भोपाळला परतणार आहेत . पत्रकारांशी बोलताना एका आमदाराने सांगितले की, “आम्ही बहुमत चाचणी सिद्ध करू. कमलनाथ सरकार पाच वर्ष चालेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे सर्व आमदारांना बुधवारी जयपूर येथे नेण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.