वाघोली- वाघोलीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याबाबत सोशल मिडीया किंवा नागरिकांच्या चर्चेमध्ये सत्यता नाही. वाघोलीत करोनाचा रुग्ण नसल्याचे वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. वाघोली परिसरामध्ये करोनाचा रुग्ण असल्याबाबत अनेक चर्चांना सोशल मीडियावर, नागरिकांच्या चर्चेमध्ये उधाण आले आहे. अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून अनेकांमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा केल्या जात आहेत.
याबाबत वाघोलीच्या वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी करोनाचा रुग्ण आढळला नसल्याचे सां गितले. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. करोनाचा रुग्ण आढळला नसला तरी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आवश्यक काळजी घेण्यात येत आहे.