जवान ‘त्या’ वेळीही सशस्त्र होते – जयशंकर यांचे राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर

आमच्या सैनिकांना शहीद होण्यासाठीच निशस्त्र पाठवले गेले का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता

Madhuvan

नवी दिल्ली – गलवान खोऱ्यातील चीन व भारतीय जवानांमध्ये झालेल्या झटापटीत २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी चिनी नेत्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे व चिनी वस्तूंचे दहन करण्यात येतंय. सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे चीन व भारतातील व्दिपक्षीय संबंध ताणले गेले असून भारताने चीनला स्पष्ट शब्दात ठणकावले आहे.

अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ शेअर करत, “चीनने आमच्या निशस्त्र सैनिकांना मारण्याची हिंमत केलीचं कशी? व आमच्या सैनिकांना शहीद होण्यासाठीच निशस्त्र पाठवले गेले का?” असे प्रश्न उपस्थित केले होते.

मात्र राहुल गांधींच्या या प्रश्नांना आता स्वतः परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या अधिकृत खात्यावरून राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर दिलं असून ते म्हणतात, “याबाबतची वस्तुस्थिती अशी की, सीमेवर तैनात असलेले सर्व जवान सदैव सशस्त्र असतात. विशेषतः आपली पोस्ट सोडण्यापूर्वी जवान स्वतः जवळ शस्त्र बाळगतातच. १५ जून रोजी देखील गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सैनिकांकडे आपली शस्त्र होती. मात्र  १९९६ व २००५ च्या करारानुसार फेसऑफ दरम्यान दोन्ही बाजूंकडून शस्त्रांचा वापर केला जाणार नाही असा समझोता करण्यात आलाय.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.