नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक अत्यंत बेजबाबदार कार चालक ओव्हरटेक करताना दोन तरुणांना धडक दिली आहे. या घटनेतील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाल्याचे यात दिसत आहे.
कार चालकाचा बेजबाबदारपणा दुचाकीवरील दोघांना महागात पडला आहे. व्हिडिओमध्ये दिसते, की भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकी थेट हवेत उडाली यानंतर जोराने रस्त्यावर आदळली. यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत.
तमिळनाडूच्या कल्लाककुरीची येथील अजित नावाचा तरुण आपला मित्र अरूण याच्यासोबत आपल्या घरी जात होता. हे दोघंही सलेम-कोइंबतूर महामार्गावरुन आपल्या दुचाकीवरुन जात होते. इतक्यात भरधाव वेगात असलेल्या एका कारने दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात अजितच्या दुचाकीला धडक दिली.
Shocking accident caused by reckless driving caught on camera at Salem – Coimbatore highway.. pic.twitter.com/qDak73f02z
— Pramod Madhav♠️ (@PramodMadhav6) July 26, 2021
वेगात असलेल्या या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुचाकीवर आदळली आणि ही घटना घडली. घटनेनंतर क्षणार्धात अजित आणि अरूण हवेत फेकले गेले. इतकंच नाही तर त्यांच्या गाडीचेही काही पार्ट तुटून हवेत उडाले आणि नंतर खाली पडले.
गाडीला मागच्या बाजूने धडक बसल्याने अरूण काही वेळात उठून उभा राहू शकला, मात्र आपल्या मित्राची अवस्था पाहून त्याला धक्का बसला. काही लोकांनी त्यांची मदत करत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेचा तात्काळ तपास सूरू केला असता संबंधित कार ही पेरामबलूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.