पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी “कोवॅक्सिन’ आणि “कोविशिल्ड’ दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात आले असून, दोन्ही मिळून 67 केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
कोविशिल्ड लस ही 61 केंद्रांवर तर कोवॅक्सिन ही लस 6 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे.
कोवॅक्सिनचे प्रत्येक केंद्रांवर तीनशे तर कोविशिल्डचे 100 डोस उपलब्ध असतील.
18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशिल्डच जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
3 मेपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मंगळवारी 20 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के ऑन दि स्पॉट दुसरा डोस दिला जाईल. तर 29 जूनला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्या 18 वर्षांवरील नागरिकांना मंगळवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे.