कुख्यात डॉन ‘छोटा राजन’वर अद्याप उपचार सुरू

नवी दिल्ली- कुख्यात डॉन छोटा राजन याचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त एम्स रुग्णालयाने फेटाळले आहे. छोटा राजन उर्फ राजन निकाळजे याला करोना संसर्ग झाल्याने गेल्या महिन्यात एम्समध्ये दाखल केले होते. राजन 2015 पासून तिहार कारागृहात आहे.

27 एप्रिलला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाच्या सुनावणीला अनुपस्थित होता. त्यावेळी कारागृह आधीकाऱयांनी त्याला करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट केले होते. त्याच्यावर दाखल असणारे सर्व गुन्हे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग केले आहेत. खंडणी खुनाचे जवळपास 70 गुन्हे त्याच्यावर मुंबईत नोंदविण्यात आले आहेत.

ज्योतिरमय डे या पत्रकाराच्या खुनात त्याला 2018 मध्ये जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. तर हनिफ कडावाला यांच्या हत्या प्रकरणातून त्याची सहकाऱ्यांसह निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2013मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात मार्च महिन्यात त्याला 10 वर्ष कारावासाची ठोठावली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.