कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात वाढ

एका वर्षात 3 किलो 432 ग्रॅम सोने आणि 10 किलो 116 ग्रॅम चांदी अर्पण

कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातला 2018 – 19 सालातला खजिना खुला करण्यात आला आहे. एक वर्षात देवीच्या चरणी भाविकांनी तब्बल 3 किलो 432 ग्रॅम सोने आणि 10 किलो 116 ग्रॅम चांदी अर्पण केलीय. मंदिरात एकूण दानपेट्या 17 आहेत त्या मधून हे दागदागिने जमा झाले आहेत.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात वाढएका वर्षात 3 किलो 432 ग्रॅम सोने आणि 10 किलो 116 ग्रॅम चांदी अर्पण…

Posted by Digital Prabhat on Friday, 21 June 2019

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने नुकताच या दागिन्यांची मोजदाद करण्यात आली विशेष म्हणजे या दागिन्यांमध्ये सोन्याचा एक किरीट आणि 11 तोळ्याच एक बिस्कीट आकर्षण ठरलय आहे. गेल्या आठवड्यात ज्यावेळी रोख मोजण्यात आली त्यावेळीही ती एक कोटी रुपयांपेक्षा जास्त गेली होती, त्यामुळे यंदा लाखो भाविकांनी मंदिरात भेट देऊन देवीच्या चरणी भरभरून दान अर्पण केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.