होमगार्ड भरतीला साताऱ्यात मोठा प्रतिसाद

जागा 667, अर्ज साडेचार हजार!

सातारा -साताऱ्यातील पोलीस परेड ग्राऊंडवर सुरू असलेल्या होमगार्ड भरतीला जिल्ह्यातील युवक- युवतींनी मोठा प्रतिसाद दिला. 667 जागांसाठी असलेल्या या भरतीला साडेचार हजार उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आजपासून (गुरूवार) होमगार्ड भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. यावेळी जिल्ह्यातील साडेचार हजार युवक- युवतींनी अर्ज भरल्याने भरती प्रक्रियेला उशीर लागला. उमेदवारांची संख्या वाढल्याने केवळ एक हजार सातशे उमेदवारांचीच कागदपत्रे पडताळणी, नैपुण्य चाचणी, मैदानी चाचणी पूर्ण झाली.

उर्वरित उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी, नैपुण्य चाचणी, मैदानी चाचणी शुक्रवारी आज घेण्यात येणार आहे. या भरतीला दहावीपासून ते पदवीपर्यंतच्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात काही उमेदवार कायद्याचे पदवीधर तर काही उमेदवार बीएस्सी ऍग्री शिक्षण घेतलेले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.