सिडनी – दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळावर कारवाई करावी, अशी विनंती केली आहे. तसेच त्यांचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणही कमी करावेत, असेही आपल्या मागणीत त्यांनी नमूद केले आहे. आयसीसीनेही या तक्रारीची दखल घेतली असून ऑस्ट्रेलिया मंडळावर कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका करोनाच्या धोक्यामुळे रद्द केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका मंडळाने आयसीसीकडे तक्रार केली असून या तक्रारीत झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाईभरपाई करण्याची तसेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुण कमी करावेत, अशी मागणी केली आहे. जर आयसीसीने ऑस्ट्रेलियाचे गुण कमी केले तर ते कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकणार नाहीत.
ऑस्ट्रेलियाचे गुण कमी झाल्यास व इंग्लंडने चौथ्या कसोटीत भारताचा पराभव केला तरी गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर येऊ शकणार नाहीत व त्यामुळेच त्यांचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न अपूर्ण राहील.