बेल्हे -साळवाडी-नारायणगाव रस्त्यावरील वसईफाटा येथे बेवारस पडलेल्या वृद्धाला तरूणांनी अन्न, वस्र, निवारा देऊन समाजात माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
हा वृद्ध तीन दिवसांपासून भरपावसात रस्त्याच्या कडेला पडून होता. त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यानंतर साळवाडी गावातील तरुण कार्यकर्ते, जुन्नर तालुका राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष अक्षय पटाडे यांना माहिती समजली.
त्यांनी व मित्र मारुती लाडंगे, अमोल पवार, राहुल औटी, संजय पटाडे, संदीप लांडगे, शशी सोनवणे, तेजस शिंदे यांनी सचिन निलख यांच्या शेडमध्ये वृद्ध व्यक्तीची निवाऱ्याची सोय केली.