-->

कोल्हापूरात फक्त 5 मुस्लिम बांधवांनी केलं नमाज पठण

कोल्हापूर (प्रतिनिधी) –  आज बकरी ईद चा सण मुस्लिम बांधवांसाठी पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून साजरा होतो. मात्र यंदा कोरोनाच संकट मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. कोरोनाच्या संकटाचा फटका यंदा बकरी ईदला देखील मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर बकरी ईद सणाच्या निमित्ताने दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर फक्त पाच मुस्लिम बांधवांनी या मैदानावर ती नमाज पठण केले.

विशेष म्हणजे या पाचही मुस्लिम बांधवांनी शासनानं दिलेल्या सर्व नियमांचं पालन करत नमाजपठण केलं तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळत जगावरच कोरोनाच संकट दूर व्हावं अशीही त्यांनी अल्लाला दुवा केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.