युनिसेफच्या अहवालातील निष्कर्ष नॉर्वे आणि डेन्मार्क दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर
लंडन : मुलांचे पालन-पोषण करणे ही सोपी गोष्ट नसते त्यातही आपल्या मुलांना सुखी आणि समाधानी ठेवणे हे पालकांना एक मोठे आव्हान वाटते. आता युनिसेफ या लहान मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्याप्रमाणे जगातील नेदरलँड या देशांमधील लहान मुले सर्वात सुखी आणि समाधानी आहेत असा निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आला आहे.त्या पाठोपाठ डेन्मार्क आणि नॉर्वे या देशांचा दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे.
युनिसेफने गेल्या वर्षभराच्या कालावधीत जगातील 41 देशांमध्ये सर्व्हे करून ही माहिती मिळवली आहे. त्यानंतर हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत कुटुंबाचे उत्पन्न त्या मुलांना मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि त्यांना मिळणारे शिक्षण या आधारे या सर्वेमधील निष्कर्ष जाहीर करण्यात आले. नेदरलँडमध्ये लहान मुलांना मिळणाऱ्या सोयी सुविधा शिक्षण आणि त्यांना मिळणारे आर्थिक समाधान यामध्ये इतर देशांच्या तुलनेत खूप पुढे असल्याने त्याचा या यादीमध्ये पहिला क्रमांक आहे.
या देशात लहान मुलांचे अतिशय सकारात्मक पद्धतीने पालन-पोषण केले जात असल्याने त्यांचे आरोग्यही चांगले आहे. मुलांना महत्त्व दिले जाते आणि कुटुंबातील सर्वात लहान सदस्य असलेल्या लहान मुलांचे मतही ऐकले जाते. त्यानंतर एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जातो. या सर्व गोष्टी लक्षात आल्याने नेदरलँडला सुखी लहान मुलांचा देश म्हणून क्रमांक देण्यात आला.