वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था अर्थात नासा गेल्या कित्येक वर्षांपासून परग्रहवासीयांचा शोध घेत आहे यासंदर्भात नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात असल्यामुळे जर नजीकच्या कालावधीमध्ये एलियन्सशी संपर्क झाला तर त्यांच्याशी कशा प्रकारे संवाद साधायचा हे ठरवण्यासाठी आता नासाने चर्चमधील काही फादर्स आणि धार्मिक संस्थामधील पुजारी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
पृथ्वीच्या परिघाबाहेर जर कोठे परग्रहवासी असतील आणि त्यांचा जर पृथ्वीशी संपर्क झाला तर त्यांच्याशी मानवतावादी दृष्टिकोनातून संपर्क साधण्यासाठी या नियुक्त्या केल्या जाणार आहेत या स्पेस मिशन मध्ये पर्स आणि पुजारी यांचा समावेश करण्यात आला असला तरी त्यांना अवकाश यानातून अंतराळात पाठवले जाणार नाही तर पृथ्वीवर बसूनच त्यांना हा संभाव्य संवाद साधण्याचे काम करावे लागणार आहे.
नासाने अशाप्रकारे एकूण चोवीस धर्मशास्त्री व्यक्तींची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला पृथ्वीवरील विविध देशांमधील धार्मिक संस्था परग्रहवासीयाकडे कशा प्रकारे बघतात हेसुद्धा या दृष्टिकोनात महत्त्वाचे ठरणार आहे ब्रिटनमधील एका चर्चमधील फादर अँड्र्यू डेविसन यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी याबाबत आपली स्वीकृती दर्शवली आहे.
अवकाशात कोठे ना कोठे परग्रहवासी असून ते कधी ना कधी पृथ्वीशी संपर्क साधतील असे त्यांनाही वाटत आहे मेक्सिकोतील एका प्रदेशात गेल्या कित्येक वर्षांपासून गाई गायब होण्याचे प्रकार घडत आहेत पाडले त्यामागे एलियन्स असावेत असा एक संशय आहे तेथील स्थानिक लोकांची पण तीच धारणा आहे.
गेल्या 60 वर्षांपासून मेक्सिकोतील या प्रदेशातील स्थानिक नागरिकांना हा अनुभव येत आहे परग्रहवासी येतात आणि आपल्या गाई घेऊन जातात असा त्यांचा संशय आहे याबाबतही आता नासाने संशोधन करावे अशी मागणी होत आहे