पुणे – दररोज रुग्ण सापडत असल्याने जनता वसाहतीतील करोना रुग्णांचा आकडा 51 वर गेला आहे. मात्र, सोमवारी शहरात सर्वाधिक 399 रुग्ण सापडल्याचा अहवाल आला असला, तरी त्यात जनता वसाहत येथील एकही रुग्ण नसल्याचे समोर आले आहे.
या भागात पोलीस तसेच महापालिकेकडून लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आले असून, बाधित परिसरातील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, असे प्रशासनाने सांगितले.